बेळगाव शहरातील आरपीडी सर्कल येथील सुसज्ज आरएमआर स्पोर्ट्स अकादमीमध्ये १० आणि ११ जानेवारी रोजी आयोजित केलेली पहिली जिल्हास्तरीय ‘टेबल टेनिस टॅलंट हंट चॅम्पियनशिप’ यशस्वी ठरली.

या क्रीडा स्पर्धेत बेळगाव शहरासह गोकाक, चिकोडी आणि जिल्ह्यातील विविध भागांतून ११० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखवले. उदयोन्मुख खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आगामी काळात ही स्पर्धा दरवर्षी घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
आरएमआर स्पोर्ट्स अकादमीचे संस्थापक संचालक मोहनदास रायकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या समारोप समारंभाला ‘एक्कस’ लिमिटेडचे मुख्य प्रशासकीय अधिकारी बसवंत पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बीटीटीए अध्यक्ष संगम बल्लूर, समाजसेविका शैलजा भिंगे, रोहन नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बेळगाव जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये अफाट प्रतिभा असून त्यांना अशा प्रकारचे उच्च दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा अकादमीचा मुख्य उद्देश असल्याचे मोहनदास रायकर यांनी म्हटले आहे.


Recent Comments