Belagavi

शुभम शेळकेंविरोधात पुन्हा ‘करवे’ने ओकली गरळ

Share

महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्या विरोधात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (टी.ए. नारायण गौडा गट) वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शुभम शेळके यांना बेळगावमधून हद्दपार करावे आणि त्यांच्यावर गुंडा ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी हास्यास्पद मागणी या संघटनेने केली आहे.

करवेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगेगनट्टी यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. शुभम शेळके सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर आपली मते मांडत असतात, मात्र यामुळे कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण होत असल्याचा निरर्थक दावा कन्नड संघटनेने केला आहे. शुभम शेळके हे जाणीवपूर्वक वादग्रस्त विधाने करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असल्याचेहि निवेदनात म्हटले आहे.

दुसरीकडे, शुभम शेळके हे केवळ लोकशाही मार्गाने मराठी भाषिकांच्या हक्कांची बाजू मांडत असताना, त्यांना लक्ष्य करण्यासाठी अशा प्रकारच्या मागण्या केल्या जात असल्याची प्रतिक्रिया मराठी भाषिकांतून उमटत आहे.

Tags: