बेळगावमधील न्यू गांधी नगर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. दिशांत चावूस असे जखमी तरुणाचे नाव असून, एका जुन्या खुनाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या मुजम्मील याने हा हल्ला केला.

पूर्ववैमनस्य मनात धरून मुजम्मीलने दिशांतच्या छातीवर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या दिशांतवर सध्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. माळमारुती पोलीस ठाण्याचे सीपीआय बी.आर. गड्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.


Recent Comments