गृहलक्ष्मी योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च २०२५ या दोन महिन्यांचा प्रलंबित हप्ता वित्त विभागाची मंजुरी मिळताच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या दोन महिन्यांच्या निधी वितरणाबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सभागृहात याविषयी माहिती दिली आहे.
फेब्रुवारी आणि मार्च २०२५ या दोन महिन्यांचा गृहलक्ष्मी योजनेचा प्रलंबित हप्ता वित्त विभागाची मंजुरी मिळताच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. अपात्र शिधापत्रिका रद्द झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या, तरी जे करदाते नाहीत अशा पात्र महिलांना अन्न विभागाकडून नवीन डेटा प्राप्त होताच योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गृहलक्ष्मी सहकारी संस्थेच्या माध्यमातून दरमहा २०० रुपये जमा करणाऱ्या महिला सहा महिन्यांनंतर कर्ज सुविधेसाठी पात्र ठरतील आणि त्यांना आरोग्य विमा देण्याचाही सरकारचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांच्या सुरक्षेसाठी ‘अक्का पथक’ ही महत्त्वाकांक्षी योजना गृह विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात आली असून, हे पथक सार्वजनिक ठिकाणी गस्त घालून शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करेल. सोशल मीडियावरील फसवणूक किंवा कौटुंबिक छळाबाबत महिला येथे तक्रार करू शकतात आणि त्यांची नावे पूर्णपणे गुप्त ठेवली जातील, असे मंत्र्यांनी सांगितले. याचवेळी हुबळी येथील महिला अत्याचार प्रकरणावर भाष्य करताना, कोणत्याही परिस्थितीत दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments