बेळगावातून सुरू असलेल्या विमानसेवा अचानक बंद करण्यात आल्याने उद्योगांचे आणि व्यापाराचे प्रचंड नुकसान होत आहे. या निर्णयाच्या निषेधार्ह लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रभाकर राममुन्नोळी यांनी दिला. गुरुवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘उडाण-३’ योजनेतंर्गत बेळगावातून अनेक विमानसेवा सुरू होत्या, ज्याचा फायदा हुबळी आणि गोव्यातील प्रवाशांनाही होत असे. मात्र, आता या सेवा बंद झाल्याने प्रत्येक उद्योजक आणि व्यापाऱ्याला आर्थिक फटका सोसावा लागत आहे. यासंदर्भात बेळगावच्या खासदारांकडे पाठपुरावा करण्यासोबतच, येत्या १८ जानेवारीला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रही मागणी करणार असल्याचे राम मुन्नोळी यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला राम भंडारी, सचिन सबनीस, सतीश कुलकर्णी, अभय पै यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments