Belagavi

देवराज अर्स यांचा रेकॉर्ड ब्रेक: सिद्धरामय्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

Share

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिवंगत देवराज अर्स यांचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम मोडीत काढल्याबद्दल आज बेळगाव महिला काँग्रेसच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी काँग्रेस सदस्य आयेशा सनदी यांनी भावना व्यक्त करताना सिद्धरामय्या यांचा उल्लेख ‘अण्णा रामय्या, भाग्या रामय्या आणि कर्नाटकचा वाघ’ असा केला. “धर्मनिरपेक्ष नेतृत्व असलेल्या सिद्धरामय्या यांनी भविष्यात देशाचे पंतप्रधान होऊन देशाची सेवा करावी,” अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कर्नाटकच्या जनतेसाठी अनेक लोकोपयोगी अर्थसंकल्प मांडले असून, यापुढेही त्यांनी अशीच जनसेवा करावी, असेही त्या म्हणाल्या.

या आनंदोत्सवात भारती पाटील, कस्तुरी भांवी, फरीदा नदाफ, मीनाक्षी बेळगाव यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Tags: