Belagavi

अनुदानित शाळा-कॉलेज कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज हळिंगळी

Share

​बेळगाव जिल्ह्यातील अनुदानित शाळा आणि महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज हळिंगळी यांची निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्य पदाधिकारी आणि स्थानिक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​अनुदानित शाळा-कॉलेज कर्मचारी संघटनेच्या या विशेष बैठकीत बसवराज हळिंगळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
​या बैठकीस राज्य अध्यक्ष जे. हनुमंतप्पा आणि राज्य सरचिटणीस रामू अ. गुगवाड यांच्यासह अन्य मान्यवर सदस्य उपस्थित होते. अशी माहिती समोर आली आहे.

Tags: