यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील कडोली गावात पशूपालन आणि पशूवैद्यकीय सेवा विभाग तसेच नाबार्ड आर.आय.डी.एफ.-३० योजनेअंतर्गत पशू चिकित्सालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.


४८.३४ लाख रुपये खर्चून ही इमारत उभारली जाणार असून, गावातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नेते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राज्याचे मंत्री आणि या भागाचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली यमकनमर्डी मतदारसंघ विकासाच्या पथावर पुढे जात आहे. या नियोजित पशू चिकित्सालयामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांना आपल्या जनावरांसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा आता गावातच उपलब्ध होणार आहेत. या सुविधेमुळे पशुपालनाला मोठे प्रोत्साहन मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सामान्य जनतेच्या गरजा ओळखून राबविल्या जाणाऱ्या अशा विविध विकासकामांच्या माध्यमातून यमकनमर्डी मतदारसंघ येणाऱ्या काळात एक आदर्श मतदारसंघ म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.


Recent Comments