Belagavi

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी

Share

विशाखापट्टणम येथे भारतीय रोलर स्केटिंग महासंघाद्वारे आयोजित ६३ व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी २ रौप्य आणि ७ कांस्य अशा एकूण ९ पदकांची कमाई करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

देशातील विविध राज्यांतील अडीच हजारांहून अधिक खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये बेळगावच्या अवनीश कोरीशेट्टीने १ रौप्य पदक, सयी पाटीलने १ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळवले. तसेच तीर्थ पाश्चापूरने २ कांस्य, खुशी घोटीवेकर, शेफाली शंकरगौडा, सोमय्या मंटूर आणि ऐश्वर्या संपगावी यांनी प्रत्येकी १ कांस्य पदक जिंकले आहे.

हे सर्व खेळाडू केएलई संस्था आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंकमध्ये सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. खेळाडूंच्या या यशाबद्दल डॉक्टर प्रभाकर कोरे आणि माजी आमदार श्याम घाटगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: