Belagavi

बसवण कुडची येथे नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे थाटात उद्घाटन

Share

स्थानिक रहिवाशांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार आसीफ सेठ यांनी बसवण कुडची येथे नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकृत उद्घाटन केले.

निवडणुकीच्या वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे दर्जेदार आरोग्य सेवा जनतेच्या घरापर्यंत पोहोचवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असून या केंद्राचे लोकार्पण ही लोकसेवेप्रती असलेली बांधिलकी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केंद्रातील उपचार सुविधांची माहिती दिली. आवश्यक कर्मचारी आणि वैद्यकीय उपकरणे तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील प्रशासनाकडून देण्यात आली. गेल्या अनेक दशकांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने बसवण कुडची आणि परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, आता तातडीच्या उपचारांसाठी शहराकडे धाव घेण्याची गरज उरणार नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि बसवण कुडची गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आरोग्य केंद्र केवळ बसवण कुडचीच नव्हे तर आसपासच्या अनेक खेड्यांसाठीही वरदान ठरणार आहे.

Tags: