मानस कराटे स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने आयोजित वार्षिक उत्सवात कराटे बेल्ट वितरण सोहळा नुकताच पार पडला. सिहान भरमानी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरती पाटील, डॉ. शिवाजीराव कागणीकर, शंकर कांबळे, राहुल पाटील, श्रद्धा चौगुले, मोहन पवार, अनिल गावडे आणि आरपीडी पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य अभय पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ब्लॅक बेल्ट’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला ऋतुजा कडोलकर, कार्तिक भागनाळ, श्रद्धा कडोलकर, सुदर्शन लाटी, पृथ्वी घेवडे यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments