बेळगाव शहरातून यंदा ८ हजार ४५७ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून परीक्षेसाठी आता केवळ ७४ दिवस शिल्लक आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये वेळ न घालवता निष्ठेने अभ्यास करून यश संपादन करावे, असे आवाहन उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी केले आहे.


बेळगावच्या सरदार्स सरकारी हायस्कूलमध्ये आयोजित पालक-शिक्षक महासभेत बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून परीक्षेला सामोरे जावे आणि काही अडचणी असल्यास निसंकोचपणे माझ्याशी किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अशी ग्वाही त्यांनी दिली. अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आपण स्वतः त्यांच्या घरी जाऊन भेटी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या सभेला शिक्षण अधिकारी लीलावती हिरेमठ, स्मार्ट सिटीच्या एमडी कविता वारंगल, बीईओ रवी भजंत्री, उपप्राचार्य एस. एस. हादिमणी यांच्यासह अमान सेठ, बी. के. रूपा आणि मोठ्या संख्येने पालक व शिक्षक उपस्थित होते.


Recent Comments