Belagavi

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठक

Share

बेळगावमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंदर्भात पूर्वतयारी बैठक घेतली. यावेळी प्लास्टिक ध्वज न वापरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला स्वातंत्र्यसैनिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनी कोठेही त्रुटी राहू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. शहरातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा-महाविद्यालयांनी आकर्षक विद्युत रोषणाई करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नूतन पोलीस अधीक्षक रामराजन के. यांनी जनस्नेही सेवा देण्याचे आश्वासन दिले असून जनतेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जिल्हा क्रीडांगणावर येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी बसफेऱ्या वाढवण्याचे निर्देश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. या बैठकीला महापालिका आयुक्त कार्तिक एम. आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: