सांबरा गावात पाण्याची मोटार चालू करताना विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


परिणीती चंद्रू पालकर असे मृत मुलीचे नाव असून ती सातवीत शिकत होती. शुक्रवारी सकाळी घरात पाण्याची मोटार सुरू करताना तिला विजेचा जोराचा धक्का बसला आणि ती जागीच कोसळली. स्थानिक तरुणांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि आजी असा परिवार आहे. सांबरा परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.


Recent Comments