नवीन वर्षाच्या प्रारंभी बेळगावातील मल्लिकार्जुन नगर आणि समर्थ नगर रहिवाशांच्या वतीने स्वामी अय्यप्पांची महापूजा आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी संध्याकाळी समर्थ नगरमध्ये स्वामींचा भव्य महाअभिषेक करण्यात आला.

समर्थ नगरमधील ३-ऱ्या क्रॉस मेन रोडवर स्वामी अय्यप्पांची विधीवत पूजा आणि विशेष अलंकार करण्यात आले होते. महापूजेनंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बेळगावमधील जनतेला सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, यासाठी यावेळी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन नगर आणि समर्थ नगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समर्थ नगरमधील सर्व अय्यप्पा भक्त आणि तरुण मंडळाने विशेष परिश्रम घेतले. स्वामींच्या आशीर्वादाने नवीन वर्षाचे स्वागत झाल्याची भावना यावेळी भक्तांनी व्यक्त केली. या धार्मिक सोहळ्यात शेकडो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.


Recent Comments