माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांना ‘प्रेमजी अचीव्हर्स अवॉर्ड – २०२५’ अंतर्गत राज्यस्तरीय ‘माध्यमरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रेमजी फाउंडेशनने, कडबूर यांच्या प्रसारमाध्यम क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल घेऊन हा सन्मान प्रदान केला आहे.

प्रसारमाध्यम क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल गुरुनाथ कडबूर यांना नुकताच प्रेमजी फाउंडेशन, पी. जी. मीडिया कम्युनिकेशन आणि युनिव्हर्सल डिजिटल वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात ‘माध्यमरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्काराबद्दल आज बेळगाव येथील वार्ता भवन येथे कर्नाटक कार्यरत पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि शहरातील पत्रकारांच्या वतीने कडबूर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार मित्र आणि माहिती विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments