महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ अंतर्गत येणाऱ्या हिंदवाडी चौथ्या आणि पाचव्या क्रॉसच्या सर्व्हिस रोडवर पेव्हर्स बसवण्यात आले आहेत. नगरसेवक नितीन जाधव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सत्तर वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे.

या भागात गेल्या सात दशकांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते, ज्याचा स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कचऱ्याचे ढीग आणि साचलेल्या घाणीमुळे या परिसराचे आरोग्य धोक्यात आले होते. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन नितीन जाधव यांनी महापालिका स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर या रस्त्याचे कायापालट करण्यात त्यांना यश आले. यामुळे अनेक वर्षांच्या दुर्गंधीतून मुक्तता मिळाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पेव्हर्स बसवल्यामुळे आता हा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही सुटला आहे, अशी भावना रहिवाशांनी बोलून दाखवली.
याप्रसंगी नागराज एच.व्ही., रविकुमार पुजारी, निखिल बचुळकर, हळदणकर, ममता पुजारी, अप्राती सुरुतेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments