Belagavi

बेळगावच्या हिंडलगा कारागृहात सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Share

बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात नवीन वर्षाच्या प्रारंभीच सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारी पहाटे मास्कधारी टोळीने कारागृहाच्या भिंतीवरून मोबाईल आणि अमली पदार्थ आत फेकून पलायन केले. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सज्जतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हिंडलगा मध्यवर्ती कारागृह एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मास्कधारी व्यक्तींनी कारागृहाच्या भिंतीवरून प्रतिबंधित वस्तूंचा पुरवठा केला. अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या कारागृहात बाहेरील बाजूने अशा प्रकारे साहित्य पोहोचवण्याचे धाडस झाल्याने सुरक्षेतील त्रुटी उघड झाल्या असून नागरिकांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

या सर्व प्रकरणाचे चित्रीकरण कारागृहाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून आरोपींनी क्षणात वस्तू आत फेकून तिथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी तपास तीव्र केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Tags: