Belagavi

बेळगावच्या ज्युडो खेळाडूंचा राज्य पातळीवर गौरव

Share

कर्नाटक सरकारच्या युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात बेळगावच्या ज्युडो खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला. २०२४ या वर्षातील सर्वोत्तम क्रीडा कामगिरीबद्दल हा सन्मान सोहळा बेंगळुरू येथे पार पडला.

बेंगळुरू येथील नृपतुंगा रस्त्यावरील राज्य युवा केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात विभागाचे आयुक्त आयपीएस आर. चेतन यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

बेळगाव ज्युडो केंद्राच्या प्रशिक्षिका रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करणाऱ्या गंगय्या चिकमठ, श्वेता अलकनूर, राधिका डुकरे, संजना शेठ, वैष्णवी भडांगे आणि आलिया मुलतानी यांचा यावेळी सत्कार झाला. या सोहळ्याला ऑलिम्पियन प्रमिला अयप्पा यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: