बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार तथा महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी गणेशपूरला भेट देऊन गावातील रस्ते विकासकामांची पाहणी केली.


बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला आपले सर्वोच्च प्राधान्य असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार गणेशपूरमधील प्रलंबित विकासकामांची आपण प्रत्यक्ष पाहणी करत असल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी मालस कॉलनी आणि क्रांतीनगरसह परिसरातील नवीन रस्त्यांच्या बांधकामाबाबत रहिवाशांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांनी मंत्र्यांकडे विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले.




Recent Comments