Belagavi

व्यसनमुक्त समाजासाठी हरियाणाच्या तरुणाची सायकलस्वारी !

Share

हरियाणा येथील महेश वर्मा हा तरुण व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी आणि लोककल्याणाचा संदेश देण्यासाठी सायकलवरून देश भ्रमंती करत आहे. दररोज सरासरी १२० किलोमीटरचा प्रवास करणारी त्याची ही सायकल यात्रा आज बेळगावात पोहोचली.

या प्रवासाद्वारे महेश व्यसनमुक्त समाज निर्माण करणे आणि गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करणे या प्रमुख मागण्यांसाठी जनजागृती करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्याची ही यात्रा सुरू असून, लहानपणापासूनच देशाला जवळून पाहण्याचे त्याचे स्वप्न होते. तरुणांनी व्यसनांच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करण्याऐवजी निश्चित ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी प्रामाणिक कष्ट करावेत, असे त्यांनी म्हटले.

महेशने आतापर्यंत १२ पैकी ७ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले आहे. आगामी काळात तो अयोध्या राम मंदिर, केदारनाथ, बद्रीनाथ, जम्मू-काश्मीर आणि मानस सरोवर असा प्रवास करणार आहे. सोशल मीडियावरील माहितीची सत्यता प्रत्यक्ष प्रवासातून पडताळून पाहणे, हा देखील त्याच्या या यात्रेचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: