बेळगाव शहरातील नामांकित सुवर्णपेढी असलेल्या मूलवीर ज्वेलर्सच्या वतीने व्यवसायातील २५ यशस्वी वर्षांच्या पूर्ततेनिमित्त ‘रौप्य महोत्सव लकी ड्रॉ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मूलवीर ज्वेलर्सचे मालक राजू शंकर बेकवाडकर आणि वरुण शंकर बेकवाडकर यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देत आहे.


पिरनवाडी जांबोटी रोड आणि शहापूरमधील दाणे गल्ली अशा दोन शाखांच्या माध्यमातून या संस्थेचा विस्तार झाला आहे. मूलवीर ज्वेलर्सने २६ व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त उद्यमबाग येथील खानापूर रोडवरील शगुन गार्डनमध्ये या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील उपस्थित होते. मूलवीर ज्वेलर्सने गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर बेळगावच्या सुवर्ण व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून या संस्थेचे योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित लकी ड्रॉमध्ये २०० हून अधिक आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यामध्ये कर्ले येथील ज्योतिबा गडकरी यांनी प्रथम क्रमांकाचे ज्युपिटर बाईक हे बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांकाचे डेल लॅपटॉपचे बक्षीस हुंच्यानट्टी येथील जमुना किन्नुरी यांना मिळाले, तर तृतीय क्रमांकाचे व्हर्लपूल रेफ्रिजरेटरचे बक्षीस ब्रह्म नगरमधील किरण सूर्यवंशी यांनी जिंकले. याशिवाय कुलर, ग्राइंडरसह इतर अनेक भेटवस्तू विजेत्यांना प्रदान करण्यात आल्या.

याच प्रसंगी मूलवीर ज्वेलर्सने ग्राहकांसाठी ‘गोल्ड सेविंग स्कीम’ आणि प्रत्येक खरेदीवर विशेष गिफ्ट कूपन योजना जाहीर केली आहे. ग्राहकांनी पिरनवाडी किंवा शहापूर शाखेला भेट देऊन या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. २५ वर्षांच्या विश्वासार्हतेचे प्रतीक असलेला हा रौप्य महोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.



Recent Comments