Belagavi

उत्तर कर्नाटकातील सिंचन प्रकल्प पूर्ण करा : आमदार लक्ष्मण सवदी

Share

सुवर्णसौध येथे विधानसभेत बोलताना अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी उत्तर कर्नाटक भागातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.

आमदार लक्ष्मण सवदी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या वजनकाट्यांची तपासणी करून त्यावर सरकारने देखरेख ठेवावी, अशी मागणी केली. तसेच, सध्या मक्याच्या दरात समस्या येत असून, मका उत्पादकांनाही चांगला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली. देशात इथेनॉल खरेदी व्यवस्थेत कोणताही भेदभाव होऊ नये. सर्वांसाठी समान पद्धतीने इथेनॉलची खरेदी व्हावी, यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा, अशी मागणीही आमदार सवदी यांनी केली.

Tags: