“छत्रपती संभाजी महाराज नसते, तर आपण सर्व हिंदू म्हणून राहिलो नसतो. जाती आणि भाषेचे भेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र यायला हवे. असे आवाहन विधान परिषद सदस्य आमदार सी. टी. रवी यांनी केले.


बेळगाव मधील कंग्राळी बुद्रुक येथे नव्याने स्थापित केलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण आमदार सी. टी. रवी आणि विविध क्षेत्रांतील प्रमुख नेत्यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी बोलताना आमदार सी. टी. रवी म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज नसते, तर आपण सर्वजण हिंदू म्हणून राहिलो नसतो. जाती आणि भाषेचे भेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र यायला हवे. आपली जात वेगळी असली तरी संस्कृती एकच आहे. त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘राष्ट्रीय नेते’ म्हणून घोषित करण्याची मागणीही केली.

याप्रसंगी व्यासपीठावर बेळगाव भाजप ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव, समितीचे नेते शुभम शेळके, श्री शिव प्रतिष्ठानचे नेते हिरामणी मुचंडी, वकील सुधीर चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य आणि भाजपचे नेते प्रदीप पाटील, येल्लोजी पाटील, ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, युवक आणि हिंदू बांधव उपस्थित होते.


Recent Comments