अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा मुलींचा फुटबॉल संघ रांची, झारखंड येथे होणाऱ्या ६९ व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.

हरियाणात नुकत्याच झालेल्या ३६ व्या अखिल भारतीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षे व १७ वर्षे मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले होते. आता हाच संघ झारखंड येथे १८ ते २२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करणार आहे.
माधव सभागृहात झालेल्या कार्यक्रमात वेगा हेल्मेट ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवाप्पा बिडी आणि सहाय्यक व्यवस्थापक श्वेता पवार यांच्या हस्ते दोन्ही संघांना फुटबॉल किट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनीही संघाला शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह संघ रवाना झाला आहे.


Recent Comments