बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी गेल्या ५ दिवसांपासून बेळगाव मुक्कामी असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज गदगला रवाना झाले.


बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी गेल्या ५ दिवसांपासून बेळगावात मुक्कामासाठी होते. आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या गदगला रवाना झाले. आज सकाळीच ते गदग मार्गे बेंगळुरूकडे जाणार होते. मात्र, हेलिकॉप्टर एक तास उशिरा आल्याने मुख्यमंत्र्यांना सर्किट हाऊसमध्ये १ तास वाट पाहावी लागली. त्यानंतर, पोलिसांनी मानवंदना दिल्यावर मुख्यमंत्री सुवर्णसौधच्या हेलिपॅडकडे रवाना झाले.

यावेळी प्रसार माध्यम प्रतिनिधींनी त्यांना ‘मतचोरी’बद्दल प्रतिक्रिया विचारली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी न बोलता, त्यांच्याकडे पाहत शिट्टी वाजवत गाडीत बसून प्रस्थान केले.
बेळगावात यंदाचे हिवाळी अधिवेशन यशस्वीरीत्या सुरू आहे. एक दिवस आधीच दाखल झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ५ दिवस बेळगावात मुक्काम करून सर्व कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उत्तर कर्नाटकच्या समस्यांवर आधीच चर्चा झाली असून, सोमवारपासून पुन्हा सुरू होणाऱ्या अधिवेशनात या भागाच्या विकासासाठी आणि समस्या निवारणासाठी सरकार कोणती पाऊले उचलणार, याकडे लोकांनी अपेक्षेने पाहिले आहे.


Recent Comments