चिकोडी-अंकली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये बेळगावच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली.

दहा वर्षे वयोगटात अक्षित अरळीकट्टी, अर्जुन कांबळे आणि गुरुविर कुरुंदवाडे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांनी प्रत्येकी सुवर्णपदक व रजत पदकांची कमाई केली. तसेच, ऋषिकेश चाळके आणि समर्थ साळुंखे यांनी कांस्यपदक मिळवले. मुलींच्या गटात, दहा वर्षे वयोगटातील अर्चना कुरूप आणि समीरा कांबळे यांनी अनुक्रमे रजत व कांस्यपदक पटकावले. तर सोळा वर्षांवरील गटात साईराज या विद्यार्थ्याने तीन प्रतिस्पर्धकांवर मात करून सुवर्णपदक मिळवले. तर, पंधरा वर्षांवरील गटात कुंदमल परमार यानेही सुवर्णपदक मिळवले.
हे सर्व विद्यार्थी सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटे या संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. या यशस्वी कराटेपटूंना बेळगाव, कर्नाटकचे वरिष्ठ कराटे मास्टर मधु पाटील, आकाश पाटील आणि प्रसाद पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजेत्या स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Recent Comments