महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळावा आयोजनाच्या पार्श्वभूमीवर, तो रोखण्यासाठी गेलेल्या कन्नड समर्थक कार्यकर्त्यांना बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.

बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने व्हॅक्सीन डेपो मैदानात महामेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती मिळताच, कर्नाटक रक्षण वेदिका टी. ए. नारायणगौडा गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगेनट्टी यांच्या नेतृत्वाखालील करवेचे कार्यकर्ते पुढे सरसावले. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन व्हॅनमधून दुसरीकडे नेले.
तसेच, कर्नाटक रक्षण वेदिका शिवरामेगौडा गटाचे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकोडी यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते व्हॅक्सीन डेपोकडे जात असताना पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी मोठा गोंधळ झाला. करवेच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर झोपून आंदोलन केले. महिला कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला आणि निषेध नोंदवला.
यानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दुसरीकडे हलवले.


Recent Comments