कावेरी रुद्रप्पा खिलाडी यांची नागनूर श्री रुद्राक्ष मठातर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘सेवारत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. शिव शिव महास्वामी यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो.

कावेरी खिलाडी यांनी विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून उल्लेखनीय सेवा दिली आहे. तसेच, लिंगायत महिला समाजाच्या सचिव म्हणून आणि जागतिक लिंगायत महिला संघटनेत सक्रिय कार्यकर्त्या म्हणून त्यांनी काम केले आहे. नागनूर श्री मठाच्या भक्त असलेल्या कावेरी खिलाडी यांनी विविध संस्थांमध्ये केलेल्या कार्याचा विचार करून त्यांना हा प्रतिष्ठित ‘सेवारत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण ८ डिसेंबर रोजी होणार आहे. पूज्य जगद्गुरू तोंटड सिद्धराम महास्वामी आणि पूज्य डॉ. अल्लमप्रभु महास्वामी यांच्या सान्निध्यात, कर्नाटक सरकारचे अवजड उद्योग मंत्री एम.बी. पाटील आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल.


Recent Comments