Belagavi

‘प्रतिभा कारंजी’ स्पर्धेत हिरेबागेवाडीची पूजा बावीमनी प्रथम

Share

बेळगाव मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय प्रतिभा कारंजी-२०२५ स्पर्धेच्या प्राथमिक शाळा विभागात कन्नड पाठांतर स्पर्धेत येथील सरकारी मराठी मुलींच्या शाळेतील सातवीची विद्यार्थिनी पूजा बसवराज बावीमनी हिने प्रथम स्थान पटकावले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका शैला कडेमनी आणि सहकारी शिक्षक तसेच एस.डी.एम.सी. सदस्यांनी पूजाचे अभिनंदन केले आहे.

Tags: