Belagavi

कन्नड संघटनांकडून मराठी फलकांवर वक्रदृष्टी

Share

हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षाच्या स्वागताकरिता मराठी भाषेत फलक लावणाऱ्या राज्य भाजपचे उपाध्यक्ष अनिल बेनके यांच्या बॅनरला कित्तूर कर्नाटक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कात्री लावून मराठी भाषेचा अपमान केला.

८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामुळे सरकार आणि विरोधी पक्ष दहा दिवसांसाठी बेळगावात तळ ठोकणार आहेत. अशा वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मराठी भाषेत स्वागत फलक लावण्यात आला होता. . मात्र, याला नेहमीप्रमाणे विरोध करत कन्नड कार्यकर्त्यांनी आपली मराठी भाषेविरोधातील कावीळ पुन्हा एकदा जाहीर करत भाषेविरोधातील संकुचित वृत्ती जगजाहीर केली आहे.

या घटनेमुळे मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. शिवाय आपण केलेल्या या कृत्याचे समर्थन करत आपला कंडू शमवून घेत स्वतःला कन्नड समर्थक म्हणवून घेणाऱ्या महेश शिगीहळ्ळी नामक कार्यकर्त्याने त्यालादेखील राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत बेळगावमधील भाषिक शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे.

कित्तूर कर्नाटक सेने या तथाकथित कन्नड समर्थक संघटनेच्या युवा शाखेचे राज्य अध्यक्ष देवेंद्र तळवार, भरमण्णा कांबळे, विद्या कमतगी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हे हीन कृत्य करुन बेळगावच्या शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. भाषिक तेढ निर्माण करण्याच्या नावाखाली बेळगावमधील मराठी भाषिकांना वेठीला धरणाऱ्या प्रशासनाकडून अशा कन्नड कार्यकर्त्यांवरही कारवाई केली जाते कि यांना अभय दिले जाते याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: