Belagavi

डॉ. सिद्धण्णा मेटी यांना बेळगावच्या नागनूर रुद्राक्ष मठाकडून ‘नुडी श्री’ पुरस्कार

Share

बेळगावच्या नागनूर रुद्राक्ष मठातर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘नुडी श्री’ पुरस्कारासाठी गोव्याच्या कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष, डॉ. सिद्धण्णा मेटी आणि त्यांच्या पत्नी नीलम्मा मेटी यांची निवड झाली आहे.

यावेळी बोलताना चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले, डॉ. सिद्धण्णा मेटी हे गोव्यात कन्नड भाषेच्या संघटनेला अधिक महत्त्व देत आहेत कन्नड भाषेच्या कार्याबद्दल नागनूर रुद्राक्ष मठाने त्यांना ‘नुडी श्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करणे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

सत्कार स्वीकारून डॉ. सिद्धण्णा मेटी म्हणाले, कन्नडचा किल्ला असलेल्या नागनूर रुद्राक्ष मठाने मला ‘नुडी श्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले, हे माझे भाग्य आहे.

करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगेनट्टी म्हणाले, बेळगावमध्ये हुक्केरी हिरेमठ आणि नागनूर रुद्राक्ष मठ हे दोन्ही मठ राज्यात कन्नड भाषेचे मठ म्हणून ओळखले जातात.

यावेळी वीरूपाक्षय्या हिरेमठ, वीरेश हिरेमठ, नागराज यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: