Belagavi

नागनूर वृद्धाश्रमाला आमदार चन्नराज हट्टीहोळींची सदिच्छा भेट

Share

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी शुक्रवारी सायंकाळी बसवन कुडची येथील देवराज अरस कॉलनीमध्ये असलेल्या नागनूर श्री शिवबसवेश्वर ट्रस्टच्या श्रीमती चन्नम्मा बसवंतय्या हिरेमठ वृद्धाश्रमास भेट देऊन, तेथील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

आमदार हट्टीहोळी यांनी आश्रमात राहणाऱ्या वृद्धांचे आरोग्य, त्यांची दैनंदिन काळजी, भोजन व्यवस्था आणि निवास व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती घेतली.

यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना अधिक आरामदायी आणि सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी आवश्यक त्या सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश चन्नराज यांनी दिले.

याप्रसंगी महिला आणि बालकल्याण विभागाचे उपसंचालक चेतनकुमार एम.एन., सीडीपीओ सुमित्रा डी.बी., सुरेखा पाटील, किरण चौगला, मनोहर बेळगावकंर, महेश कोलकार, महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: