बेळगाव मध्ये होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील राणी चन्नम्मा चौकातील वाहतूक कोंडी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि महापालिका आयुक्त कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी चन्नम्मा चौकात पाहणी करण्यात आली.

बेळगाव शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राणी चन्नम्मा चौकातून दररोज हजारो वाहनांची वाहतूक होते. अधिवेशनादरम्यान सामान्य नागरिक, आमदार, मंत्री आणि अधिकाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेकडून केलेल्या पूर्वतयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना महापालिका आयुक्त कार्तिक म्हणाले, बेळगावच्या चन्नम्मा चौकात आंदोलने पूर्णपणे प्रतिबंधित करण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि शहर पोलीस विभागासोबत चर्चा केली जाईल. चन्नम्मा चौकाचा विस्तार मोठा असल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पाहणी सुरू आहे.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, महापालिकेच्या उप-आयुक्त लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments