अधिवक्ता दिनानिमित्त विजापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश हरीश ए. यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराचा प्रारंभ केला.


विजापूर जिल्हा अधिवक्ता संघ, न्याय विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा आरोग्य विभाग, शिवगिरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय रेड क्रॉस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश हरीश ए. यांनी रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी अनेक अधिवक्ता आणि न्यायाधीशांनीही रक्तदान केले.

“रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, अधिवक्ता दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी अशा शिबिराचे आयोजन करणे, ही सामाजिक बांधिलकी दर्शवते. रक्तदान करून आपण अनेक गरजूंना जीवदान देऊ शकतो.” अशा शब्दांत त्यांनी रक्तदानाच्या महान कार्याचे महत्त्व स्पष्ट केले.
याप्रसंगी रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. शिवगिरी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तसेच चित्रपट निर्माते वसंतकुमार पाटील, आरती देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments