के. एल. ई. सोसायटीच्या राजा लखमगौडा विज्ञान संस्था , बेळगाव येथे आंतर पीयूसी विज्ञान आणि सांस्कृतिक महोत्सव ‘आरएलएस-फिएस्टा २०२५’ चे उद्घाटन आज पार पडले.


सर सी. व्ही. रामन सभागृह, आर. एल. एस., बेळगाव येथे आयोजित या उद्घाटन समारंभाला आयसीएमआर-एनआयटीएम, बेळगाव येथील शास्त्रज्ञ ‘जी’ आणि संचालक डॉ. सुबर्णा रॉय यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली.

यावेळी कर्नाटक सरकारचे माजी मुख्य सचेतक आणि के. एल. ई. सोसायटीचे व्यवस्थापन मंडळ सदस्य महांतेश एम. कवटगीमठ हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. आर. एल. विज्ञान संस्थेचे स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष लिंगौडा व्ही. देसाई यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.
प्राचार्या डॉ. जे. एस. कवळेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. या महोत्सवात विज्ञान आणि संस्कृतीचा संगम साधत आंतर-महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.


Recent Comments