Belagavi

बेळगाव वॉर्ड २९ मध्ये ‘स्वच्छता ॲक्शन’: नियम मोडणाऱ्यांना दणका

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक २९ मध्ये नगरसेवक नितीन जाधव यांनी ‘ॲक्शन मोड’मध्ये काम करत स्वच्छता मोहिमेचा धडाका लावला आहे. परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली असून, विशेषतः घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम आता तीव्र करण्यात आली आहे.

स्वच्छ शहर उपक्रमाला अधिक प्रभावीपणे चालना देण्यासाठी नागरिकांनी घरातून निघणारा कचरा योग्य पद्धतीने टाकावा आणि महानगरपालिकेच्या नियमांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नगरसेवक नितीन जाधव यांनी केले आहे.

परिसरात होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी ही दंडात्मक कारवाई यापुढेही सातत्याने सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरिकांकडून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच, स्वच्छतेबाबत अधिकाधिक जनजागृती वाढवण्यासाठी स्वयंसेवक आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या मदतीने ही मोहीम प्रभावीपणे पुढे नेली जात आहे.

Tags: