भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या ऐतिहासिक वाटचालीचा गौरव साजरा करण्यासाठी कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, समाज कल्याण विभाग आणि विविध दलित संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘संविधान समर्पण दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून संविधान यात्रेने होईल. ही रॅली चन्नम्मा सर्कल मार्गे पुढे जात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात समारोप करेल. त्यानंतर संविधान मूल्यांवर आधारित व्यासपीठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती देताना दलित नेते मल्लेश चौगुले यांनी केवळ दलित बांधवांनीच नव्हे, तर बेळगावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानाच्या गौरवात आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ राजू सेठ, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, महापौर मंगेश पवार व उपमहापौर विना जोशी, तसेच सर्व आजी-माजी आमदार आणि निवडून आलेले प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, प्रादेशिक आयुक्त श्रीमती जानकी के. एम., पोलीस आयुक्त डॉ. चेतन सिंग राठोड, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर एस. गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे हेही उपस्थित असणार आहेत.
या प्रसंगी जीवन कुरणे, प्रवीण मैत्री, संदीप कोलकर, रघु कोलकर आणि कृष्णा कांबळे उपस्थित होते.


Recent Comments