बेळगावच्या ‘केएएचईआर’ डीम्ड विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या जे.एन. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. शिवस्वामी एस. मुडिगुंड यांना प्रतिष्ठित ‘काच समुदाय चॅम्पियन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

२१ नोव्हेंबर २०२५ रोजी कलबुर्गी येथील ‘जीआयएमएस’मध्ये झालेल्या ‘कर्नाटक समुदाय आरोग्य संघटने’च्या ३५ व्या राज्य परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समुदाय आरोग्य क्षेत्रात डॉ. शिवस्वामी मुडिगुंड यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सेवेसाठी त्यांना हा गौरव प्राप्त झाला आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय शरण प्रकाश पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. समुदाय आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रांमध्ये डॉ. शिवस्वामी मुडिगुंड यांनी दिलेल्या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले. हा पुरस्कार बेळगावच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी आणि जे.एन. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आणखी एक अभिमानास्पद यश ठरला आहे.


Recent Comments