विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी अखिल कर्नाटक विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्था संघटनेचे राज्य सल्लागार एस.एस. मठद यांनी केली.

मंगळवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने खासगी शिक्षण संस्थांना अनुदान देत असल्याचे म्हटले आहे, परंतु आमच्या मागण्यांना सरकार योग्य प्रतिसाद देत नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी खासगी विनाअनुदानित शाळा बंद करून या भव्य आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन एस.एस. मठद यांनी केले.
संघटनाध्यक्ष रेवणसिद्धप्पा यांनी सांगितले की, १९९५ पासून शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रात अनुदान दिले जाते, पण कर्नाटकात भेदभाव आहे. शिक्षक कष्ट घेत असूनही सरकार शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करत आहे. ३० वर्षांपासून संघर्ष करूनही मागणीला प्रतिसाद नाही. सरकारने सावत्र आईचे धोरण ठेवले. शिक्षक निवृत्त होऊनही जागा भरल्या नाहीत. खासगी शाळांवर गदा आणणे हे दुर्दैवी आहे, असे त्यांनी नाराजीने स्पष्ट केले.
यावेळी सलीम कित्तूर, गुरुनाथ रेड्डी, पी.बी. होसूरु, अनिल जाधव, मल्लिकार्जुन लोणी, एम. मौलानी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments