Belagavi

बेळगावमध्ये राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन

Share

पदवीपूर्व कॉलेजमधील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धांचे आयोजन २६ नोव्हेंबरपासून मालिनी सिटी परिसरात करण्यात आले आहे, अशी माहिती एस.एन. देसाई यांनी दिली.

सोमवारी बेळगावातील माहिती विभागात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक, पदवीपूर्व, बेळगाव आणि गोविंदराम सेक्टेरिया विज्ञान पदवीपूर्व कॉलेज, टिळकवाडी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एस.जी.एफ.आय नियमांनुसार या स्केटिंग स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

या स्पर्धेत राज्याच्या विविध जिल्ह्यांतून एकूण १०० हून अधिक स्केटर, त्यांचे पालक, स्वयंसेवक आणि कॉलेज कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यानुसार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० ते ९.३० या वेळेत आणि त्यानंतर सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शिवगंगु स्केटिंग स्पोर्ट्स क्लब, ओम नगर रोड, बेळगाव येथे रिंक रेससह एकूण सात प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नागराज मरेण्णवर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते

Tags: