Dharwad

मेंढ्यांच्या झुंजीदरम्यान वादाची ठिणगी; एका युवकाला १० जणांनी चोपले

Share

धारवाड तालुक्यातील रामापूर गावात मेंढ्यांच्या झुंजीदरम्यान क्षुल्लक कारणावरून एका युवकाला १० जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

रामापूर गावात मेंढ्यांची झुंज आयोजित करण्यात आली होती. या झुंजीसाठी कोतूर गावातून एक तरुण आपली मेंढी घेऊन आला होता, तर गुळेदकोप्पा गावातूनही काही तरुण आपल्या मेंढ्या घेऊन आले होते. दरम्यान, या दोन्ही गटांतील तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार वाद झाला. याच वादातून १० तरुणांच्या एका टोळक्याने कोतूर गावातील युवकाला बेदम मारहाण केली. युवकाला मारहाण करत असतानाचा हा थरार स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. ही घटना आळणावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: