Belagavi

‘मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज’चा बेळगावात काळ्या फिती लावून निषेध

Share

मेडिकल आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्हजसाठी घातक ठरू शकणारा नवीन कायदा लागू करू नये, या मागणीसाठी बेळगावातील मेडिकल आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्हजनी आज हातावर काळ्या फिती लावून तीव्र आंदोलन केले.

बेळगावातील मेडिकल आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्हजनी हातावर काळी फित बांधून सरकारच्या संभाव्य निर्णयाचा निषेध केला. असोसिएशनच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले.

बेळगावात ८७५ नोंदणीकृत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह्ज कार्यरत आहेत. बेळगाव मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे सचिव प्रसाद देसाई यांनी यावेळी बोलताना, ‘सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज’ कायदा १९७६ चे संरक्षण करावे. सरकारने लागू करू पाहणाऱ्या लेबर कोडमुळे आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज कायद्याअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टार्गेट न देता, निश्चित वेळेत वेतन द्यावे. तसेच त्यांच्या कामाचे तास निश्चित करावेत. याशिवाय ग्रॅच्युइटी आणि ईएसआय योजना लागू करावी, अशी मागणी केली.

यावेळी मेडिकल आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह्ज मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: