न्यायालयात प्रलंबित असलेली आणि दाखलपूर्व असलेली प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी विजापूर जिल्ह्याच्या स्तरावर १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विजापूरचे जिल्हा न्यायाधीश हरीश ए. यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्र आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाच्या वतीने ही लोक अदालत आयोजित केली जात आहे. नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे त्यांनी सांगितले की, दरवर्षी चार वेळा राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते. आता होणारी ही वर्षातील चौथी लोक अदालत आहे. पहिली लोक अदालत ८ मार्च रोजी, दुसरी १२ जुलै रोजी, तर तिसरी लोक अदालत १३ सप्टेंबर रोजी झाली होती.


Recent Comments