बेळगाव शहर विभागीय स्तरावरील उर्दू ‘प्रतिभा कारंजी’ आणि कला महोत्सवाचे उद्घाटन बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले.


बेळगाव शहरातील वीरभद्र शासकीय उर्दू शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील विविध उर्दू माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कला, संस्कृती, शैक्षणिक विषय आणि रचनात्मक अभिव्यक्तीसह अनेक विभागांमध्ये आपली प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी हे व्यासपीठ विद्यार्थ्यांना देऊन गेले.


उद्घाटनानंतर बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी स्पष्ट केले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढते. सांस्कृतिक आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यात ‘प्रतिभा कारंजी’ आणि कला महोत्सवाचा वाटा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.

हा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने बेळगाव विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला शाळेतील कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती.


Recent Comments