Vijayapura

विजापुरात अमोघ सिद्धेश्वर जत्रा मोठ्या उत्साहात संपन्न

Share

विजापूर जिल्ह्यातील अरकेरी आणि जालगेरी भागातील मुम्मट्टीगुड्डा येथील अमोघ सिद्धेश्वर महाराजांची यात्रा भाविकांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात पार पडली.

अमोघ सिद्धेश्वर हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे सेवक होते. त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन शिव-पार्वती यांनी त्यांना विशेष शक्ती प्रदान करून पृथ्वीवर लोककल्याणाचे कार्य करण्यास सांगितले, अशी आख्यायिका आहे. पृथ्वीवर आल्यानंतर अमोघ सिद्धेश्वर यांनी लोककल्याणासाठी खूप कष्ट घेतले. हजारो वर्षांपूर्वी अराकेरी आणि जालगेरी या गावांच्या मध्यभागी असलेल्या मुम्मट्टीगुड्डावर त्यांनी निवास केला आणि अनेक चमत्कारांच्या माध्यमातून ते आजही भक्तांचा उद्धार करत आहेत, असे मानले जाते. ज्यांना संतती नाही त्यांना संतती, धन-संपत्ती आणि भक्तांच्या समस्या दूर करणारे ‘चमत्कारी पुरुष’ म्हणून त्यांची ख्याती आहे.

दरवर्षी कार्तिकी अमावस्येच्या निमित्ताने अमोघ सिद्धेश्वर महाराजांची जत्रा तीन दिवसांसाठी भरते. या जत्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, विविध गावांमधील भाविक पालख्या घेऊन येथे येतात. विशेष म्हणजे, कोणत्याही जात, धर्म किंवा पंथाचा भेद न ठेवता सर्व लोक या जत्रेत सहभागी होतात. गेल्या तीन वर्षांत कोविडमुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता, मात्र गेल्या वर्षी कोविडचा धोका कमी झाल्याने जत्रा उत्साहात पार पडली होती. यावर्षी गुड्डापूर येथील दानम्मादेवीची जत्रा आणि अराकेरी येथील अमोघ सिद्धेश्वराची जत्रा अशा दोन्ही जत्रा एकाच वेळी, तीन दिवस एकत्रितपणे साजरा करण्यात येत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील अराकेरी व जालगेरी गावांत आयोजित केलेल्या अमोघ सिद्धेश्वर जत्रेत मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती.

Tags: