बेळगावच्या सी.ई.एन. सेलचे पोलीस निरीक्षक म्हणून जे. एम. कालिमिर्ची यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.

यापूर्वी जे. एम. कालिमिर्ची हे बेळगावच्या माळमारुती पोलीस ठाण्याचे सी.पी.आय. होते. त्यावेळी सरकारने त्यांना कोणतेही विशिष्ट स्थळ न दर्शवता त्यांची बदली केली होती आणि त्यांच्या जागी बी. आर. गड्डेकर यांची नियुक्ती केली होती. आता मात्र सरकारने त्यांना बेळगावच्या सी.ई.एन. सेलमध्ये सी.पी.आय. म्हणून नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे.
१ नोव्हेंबर रोजी काळ्या दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यासोबत छायाचित्र काढल्यामुळे कालिमिर्ची यांची बेळगावहून बदली करण्यात आली होती.. या घटनेमुळे राज्यभर मोठी चर्चा झाली होती. आता पुन्हा त्यांची बेळगावमध्येच सी.ई.एन. सेलचे सी.पी.आय. म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


Recent Comments