
राज्यातील महिलांनी लघुउद्योग स्थापित करण्यासाठी सरकारने आर्थिक आणि सर्व प्रकारे पाठिंबा देण्याची ग्वाही महिला आणि बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.


कर्नाटक वाणिज्य आणि उद्योग महासंस्थेच्या कार्यक्रमात बोलताना महिला आणि बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिलांना उद्योगासाठी वार्षिक तीन टक्के व्याजदराने पाच कोटी रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. जास्तीत जास्त महिलांनी स्वतःचे उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे, यासाठी सरकार प्रोत्साहन देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेसाठी बत्तीस हजार कोटी रुपये दिले असून, सरकार महिलांच्या विकासावर वार्षिक बावन्न हजार कोटी रुपये खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी एका शेतकऱ्याची मुलगी असून, माझे दोन साखर कारखाने आहेत, ज्यात मी मोठ्या संख्येने महिलांना रोजगार दिला आहे,’ अशी माहिती देऊन त्यांनी महिलांनी धैर्य ठेवून पुढे येण्याचे आवाहन केले, कारण आता मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्याचा काळ आला आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमा रेड्डी, ज्येष्ठ उपाध्यक्ष साई प्रसाद, उपाध्यक्ष बी. पी. शशीधर, डेन्मार्कचे कौन्सिल जनरल पीटर विंटर श्मिडथ आणि जपानचे मिहो सकत मल्हान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Recent Comments