
लक्ष दीपांच्या प्रकाशात बेळगावची दक्षिण काशी असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर उजळून निघाले. महादेवाच्या हजारो भाविकांनी कार्तिक दीप प्रज्वलित करून हा ‘लक्षदीपोत्सव’ यशस्वी केला.


महादेवाच्या भक्तीत तल्लीन करणारा हा लक्षदीपोत्सव बेळगावच्या दक्षिण काशी श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेळगावच्या श्री कपिलेश्वर मंदिरात कार्तिक दीपप्रज्वलन आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम श्री कपिलेश्वराला विशेष पूजा अर्पण करून महाआरती करण्यात आली, त्यावेळी होणारा नादधुंदुभी आणि शंखनाद ऐकून उपस्थित भाविक भक्तीत लीन झाले.

लक्षदीपोत्सवाच्या निमित्ताने सभागृह मंडप तसेच मंदिराच्या आवारात आकर्षक आणि भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. हजारो लोकांनी पणत्या लावून कपिलेश्वराला नमन केले. मंदिराची नवी कल्याणी तसेच परिसरातील गोपुर अशा सर्वत्र दिव्यांचा प्रकाश पसरला होता. युवक, युवती, महिला, लहान मुले, वृद्ध अशा सर्वांनीच श्री कपिलेश्वराच्या क्षेत्रातील या दीपप्रज्वलन सोहळ्यात भाग घेतला.

बेळगावचे दक्षिण काशी श्री क्षेत्र हे एक ऐतिहासिक ठिकाण असून, कपिलेश्वराच्या दर्शनासाठी विविध ठिकाणांहून भक्त येतात. लक्षदीपोत्सवातही हजारो भाविक उपस्थित राहून महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसून आले.



Recent Comments