
घरात गुदमरून तीन तरुणांच्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणासंदर्भात, या तिन्ही तरुणांचे शवविच्छेदन बुधवारी ‘बिम्स’ शवागृहात पूर्ण झाले आणि त्यांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेत रिहान मत्ते (२२), सरफराज हरपणहळ्ळी (२२) आणि मोईन नालबंद (२२) यांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बेळगाव येथील अमन नगरमध्ये घडली होती. घरात धूर करण्यासाठी एका टोपलीत कोळसे पेटवून हे चार तरुण झोपले होते. घराला खिडक्या नसल्यामुळे योग्य वेंटिलेशन झाले नाही. त्यामुळे धुरामुळे गुदमरून तिघांचा मृत्यू झाला.
या घटनेतील चौथा तरुण, शहानवाज हरपणहळ्ळी याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments